आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » आंतरराष्ट्रीय » अमेरिकी विद्यार्थ्यांची टक्कर बंगलोरशी- ओबामा
Feedback Print Bookmark and Share
 
ND
ND
बीजिंग आणि बंगलोरच्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांशी टक्कर घेता यावी अशा शैक्षणिक गुणवत्तेचे मानक अमेरिकी शाळांनी विकसित करायला हवे, अशी अपेक्षा आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केली. गेल्या सहा महिन्यात ओबामांनी दुसर्‍यांदा बंगलोरचे उदाहरण आपल्या भाषणत दिले.

अमेरिकेतील ढासळत्या शैक्षणिक दर्जाला आधार देण्यासाठी चार अब्ज डॉलरची मदतही जाहिर केली. आता अमेरिकन संघराज्यातील सर्वच राज्ये आंतरराष्ट्रीय स्टॅंडर्ड विकसित करत आहेत, ही चांगली बाब आहे. पण येथून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना केवळ शिकागो किंवा लॉस एंजिल्सच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करायीच नसून बीजिंग आणि बेंगलोरशीही त्यांची स्पर्धा आहे. गेल्या मे महिन्यातही ओबामांनी बेंगलोरला नाही म्हणून बफेलो सिटीला होय म्हणावे असे म्हटले होते. बफेलो सिटी म्हणजे न्यूयॉर्क किंवा इतर अमेरिकी शहरे असे त्यांना म्हणायचे होते.
संबंधित माहिती शोधा