आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » आंतरराष्ट्रीय » झरदारी व कियानी यांच्‍यात मतभेद नाहीत- मलीक
Feedback Print Bookmark and Share
 
पाकिस्तानचे राष्ट्राध्‍यक्ष आसीफ अली झरदारी आणि सैन्‍य प्रमुख जनरल अशफाक परवेज कियानी यांच्‍यात कुठलेही मतभेद नसून काही लोकांकडून याबाबत जाणून-बुजून अफवा पसरवल्‍या जात असल्‍याची माहिती गृहमंत्री रहमान मलीक यांनी दिली.

मलिक यांनी पार्लमेंट हाउसमध्‍ये पत्रकारांना याबाबत सांगितले, की राष्ट्राध्‍यक्ष आणि सैन्‍य प्रमुखांमध्‍ये कुठलेही मतभेद नसून काही लोकांकडून केवळ राजकारणासाठी अशा प्रकारच्‍या अफवा पसरवल्‍या जात आहेत.

काही दिवसांपूर्वी याबाबत अशा बातम्या पसरल्‍या होत्या की सेनादल आणि राष्ट्राध्‍यक्ष कार्यालयात कॅरी लुगर कायद्यानुसार अमेरिकन मदतीशी संबंधित काही गोष्‍टींबाबत मतभेद आहेत.
संबंधित माहिती शोधा