पाकिस्तानी अधिका-यांनी विना परवानगी पाकच्या सागरी सीमेत प्रवेश करणा-या 13 भारतीय मच्छिमारांना अटक केली असून त्यांच्या नौका जप्त केल्या आहेत.
या संदर्भात एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार पाकच्या नौवहन सुरक्षा एजन्सीने (एमएसए) तीन मत्स्याखेट नौका जप्त केल्या असून त्यातील 13 मच्छिमारांना अटक केली आहे.