पाकमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया आणि देशांतर्गत भागात दहशतवाद भडकावल्या प्रकरणात भारताच्या भूमिकेबाबतचा मुद्दा पाकिस्तान शेजारील राष्ट्रासमोर मांडणार असल्याचे पाकिस्तान परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अब्दुल बासित यांनी सांगितले.
दक्षिण वजीरिस्तानात दहशतवाद्यांविरोधातील अभियाना दरम्यान भारतात तयार झालेले शस्त्रास्त्रे, नकाशे आणि कागदपत्रे आढळून आली असल्याचा दावा पाकने केला आहे.
बासित यांनी सांगितले, की या भागातून दहशतवाद संपविण्यासाठी पाक करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल संपूर्ण जगाला माहिती आहे. मात्र केवळ भारत त्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. ही बाब दुःखद आहे. भारताच्या भूमीवर कुठलीही दहशतवादी घटना घडली तर त्यासाठी पाकला जबाबदार धरले जाते. मात्र भारतही दक्षिण वजीरिस्तानात दहशतवादाला खतपाणी घालत आहे.