आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » आंतरराष्ट्रीय » भारत-पाक यांनी वाद टाळावेत: अमेरिका
Feedback Print Bookmark and Share
 
पाकिस्तानातील संघटनांकडून भारतात दहशतवादी हल्‍ला झाल्‍यास प्रत्युत्तरा दाखल पाकवर हल्‍ला केला जाईल या भारताच्‍या चेतावणीनंतर अमेरिकेने दोन्‍ही देशांनी वाद टाळून शांतता आणि सुरक्षेसाठी एकत्र काम करावे असे आवाहन केले आहे.

अमेरिकन उप संरक्षण मंत्री विल्‍यम्‍स जे. लिन यांनी याबाबत सांगितले, की दक्षिण आशियात शांतता प्रस्‍थापित करणे महत्‍वाचे आहे. दोन्‍ही देशांनी वाद टाळून एकमेकांबद्दलच्‍या विश्‍वासात अधिक दृढता आणण्‍याची गरज आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्‍ये गेल्‍या काही दिवसांपासून वाक्युध्‍द सुरू असून भारताने पाकिस्‍तानला स्‍पष्‍ट शब्‍दात चेतावणी दिली आहे, की जर भारतावर दहशतवादी हल्‍ला झाला तर आम्ही प्रत्युत्तरात हल्‍ला करू. तर पाकने भारतावर तालिबानला पाठबळ देत असल्‍याचा आरोप केला आहे.
संबंधित माहिती शोधा