आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » आंतरराष्ट्रीय » लष्करात मुस्लिम असावेत काय?
Feedback Print Bookmark and Share
 
ND
ND
अमेरिकेत लष्कराच्या छावणीत एका मुस्लिम मानसोपचार तज्ज्ञ अधिकार्‍याने आपल्याच सहकार्‍यांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारानंतर मु्स्लिम आणि लष्कर यांच्या संबंधातली नवी चर्चा सुरू झाली आहे. लष्करात मुस्लिमांचा प्रवेश द्यावा काय आणि त्याचे फायदे तोटे यांची मांडणी केली जात आहे.

अमेरिकी लष्करात साडेदहा लाखाच्या आसपास सैनिक आहेत. त्यातल मुसलमान जेमतेम साडेतीन हजार आहेत. कालच्या गोळीबार प्रकरणातला मेजर निदाल मलिक हसन यापैकीच एक.

हसनने आपल्याच सहकार्‍यांवर गोळीबार का केला हे अद्याप उघड झालेले नाही. पण हसनची इस्लामवर दृढ श्रद्धा होती. इस्लामच्या बाबतीत तो खूप संवेदनशीलही होता. अमेरिकेकडून इराक आणि अफगाणिस्तानवर झालेल्या आक्रमणात मुस्लिमांची झालेली गळचेपी त्याला अस्वस्थ करणारी वाटत होती. त्यातच त्याला अफगाणिस्तानात पाठविण्यात येणार होते. त्यामुळे आपल्याच धर्मबांधवांविरूद्ध शस्त्र हातात घ्यायचे हे त्याला सहन होत नव्हते.

हसनच्या एका सहकार्‍यानेही याला दुजोरा दिला. मुस्लिमांवर आक्रमण करणार्‍यांविरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे, अशी त्याची भूमिका होती.

हसनच्या एका नातेवाईकाच्या मते मुस्लिम असल्याने हसनला भेदाभेदही सहन करावा लागत होता. म्हणूनच त्याला नोकरी सोडायची होती.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास जारी आहे. पण आता लष्करात मुस्लिमांना प्रवेश देऊ नये अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: मुस्लिम मुसलमान