कराचीत लपलाय मुल्ला उमर!

कराची , शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2009( 16:17 IST )
तालिबानी दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचा शोध घेण्यासाठी अमेरिका पाक सरकारला कोट्वधी रुपये देत आहे. दुसरीकडे पाक तालिबानी नेत्यांना सुरक्षित स्थळी हालवत असल्याचे उघड झाल्याने अमेरिकेच्या विश्वासाला मोठा तडा गेला आहे.
एका अमेरिकी वर्तमानपत्राने तीन अमेरिकी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त प्रकाशित केले आहे. पाकमधील गुप्तहेर संस्था आयएसआयने तालिबानी दहशतवादी मुल्ला मोहंम्मद उमर याला सुरक्षित क्वेटा शहरात ठेवल्याचे यात म्हटले आहे.
रमजान महिना संपल्यानंतर उमरला पाक अधिकाऱ्यांनी कराचीत नेले आहे. उमरने कराचीत एका कौन्सिलची स्थापनाही केल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.