पंतप्रधान मनमोहन सिंह आणि अमेरीकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यात पुढील आठवड्यात होणा-या भेटी दरम्यान हरित तंत्रावर दोघांमध्ये चर्चा होणार असली तरीही जलवायु परिवर्तन विषयावर दोन्ही देशांमध्ये असलेले मतभेद सोडविण्यासाठी त्यावेळी कुठलीही चर्चा अपेक्षित नसल्याचे जलवायू शास्त्रावर संयुक्त राष्ट्र समूहाचे अध्यक्ष राजेंद्र पचौरी यांनी सांगितले आहे.
पचौरी यांनी एका टेलीकॉन्फ्रेसच्या माध्यमातून पत्रकारांना सांगितले, की गेल्या सहा महिन्या दरम्यान जलवायु परिवर्तन मुद्यावर दोन्ही देशांमधील मतभेद वाढले आहेत. कार्बन उत्सर्जन विषयाबाबत अमेरीकेची ठोस जबाबदारी निश्चित नसल्याने हे मतभेद वाढले असून दोन्ही नेत्यांच्या भेटीत त्यातून काही तोडगा निघणे अशक्य आहे.