गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल इटलीत दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यासाठी आर्थिक पुरवठा या आरोपींनी इटलीतून केल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इटलीत मुंबई हल्ल्याच्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना इटलीच्या ब्रेसिया या शहरातून अटक करण्यात आली असून दोघांवर दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दावा केला आहे, की दोघांनी आरोपींना मुंबईवर हल्ल्यासाठी निधी उपलब्ध करून दिला असून त्याचा वापर दहशतवाद्यांना इंटरनेट फोन उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आला आहे.