आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | फ्लॅशबॅक-26/11 | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » आंतरराष्ट्रीय » बलुचिस्तानमध्‍ये भारतीय हस्तक्षेपाचे पुरावे सादर!
Feedback Print Bookmark and Share
 
पाकिस्तानी गुप्तचर संस्था 'आयएसआय'चे प्रमुख अहमद शुजा पाशा यांनी अमेरिकेच्या 'सीआयए' या गुप्तचर संस्थेचे प्रमुख लिओन पानेटा यांच्यासोबत झालेल्या बैठकी दरम्यान त्यांच्याकडे पाकिस्तानच्या बलुचिस्तान व वझिरिस्तानमधील दहशतवादास असलेल्या भारताच्या कथित पाठिंब्यासंदर्भातील पुरावे सादर केल्याचे वृत्त स्‍थानिक माध्‍यमांनी दिले आहे.

या बैठकीत जनरल शुजा यांनी पाकिस्तानच्या दहशतवादाविरोधी अभियानास मदत करण्यात अमेरिका अपयशी ठरल्याची टीका केल्यावर दोन्ही अधिकार्‍यांमध्ये तीा मतभेद निर्माण झाल्याचे, सूत्रांकडून समजते. पाकिस्तानात अराजकता निर्माण करण्यासाठी अफगाणिस्तानात दडून बसलेल्या दहशतवादी संघटनांची गुप्त माहिती देण्यात सीआयए अपयशी ठरल्याबाबत शुजा यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाकिस्तान दौर्‍यादरम्यान पानेटा यांनी त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी, पंतप्रधान युसूफ रझा गिलानी आणि लष्करप्रमुख जनरल अशफाक कयानी यांचीही स्वतंत्ररित्या भेट घेतल्याचे वृत्त 'द नेशन'ने दिले आहे.
संबंधित माहिती शोधा