भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये चीन मध्यस्थी करणार नसून दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष चर्चा व्हावी असा आपला पवित्रा असल्याचे चीनने स्पष्ट केले आहे. यापूर्वी चीनने यात हस्तक्षेपाची तयारी दर्शविली होती. मात्र हा प्रस्ताव भारताने स्पष्ट शब्दात फेटाळून लावला होता.
भारत सरकारच्या सूत्रांनी या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार चीनने भारत सरकारला स्पष्ट केले आहे, की भारत-पाक संबंधांमध्ये तिस-या देशाचा हस्तक्षेप नको या भारताच्या भूमिकेचा आम्ही सन्मान करतो.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांच्या बीजिंग येथील भेटीनंतर चीन-अमेरिका संयुक्त वक्तव्यात भारत-पाक संबंधांचा उल्लेख करण्यात आल्याबद्दल भारताने स्पष्ट नाराजी व्यक्त करून यात तिस-या किंवा चौथ्या कोणत्याही देशाची मध्यस्थता स्वीकारली जाणार नाही असे स्पष्ट केले होते.