इस्लामाबाद, गुरूवार, 23 फेब्रुवारी 2012( 12:53 IST )
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येमध्ये आपला सहभाग असल्याचे आरोप माजी लष्कराधिकारी परवेझ मुशर्रफ यांनी आज फेटाळले. बेनझीरना कोणी मारले याची माहिती त्यांचे पती व पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी यांना असल्याचाही दावा लंडनमध्ये निर्वासित म्हणून राहत असलेल्या मुशर्रफनी दूरचित्रवाणी वाहिनीशी बोलताना केला.