मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रिया मित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सरकार कार्यकाळ पूर्ण करणार :पंतप्रधान
भाषा
मध्यावधी निवडणुकांची शक्यता फेटाळताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल याबाबात विश्वास व्यक्त केला. भारत-अमेरीका अणुकरार पूर्णत्वास न गेल्यास तो काही जीवनातील शेवटचा क्षण नसणार असे वक्तव्य केले आहे.

निवडणूक अद्याप खूप दूर आहे. सरकारला आणखीन दीड वर्ष पूर्ण करायचे आहे, असे स्पष्ट करताना सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल याबाबत आशावाद व्यक्त केला आहे.

अणुकरारावरून डावे पक्ष व सरकारमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ते प्रश्नांना उत्तर देत होते. अणुकरारासाठी पंतप्रधानांनी विशेष जोर दिला असल्यामुळे करार पूर्णत्वास न गेल्यास पंतप्रधानांच्या विश्वासाहार्यतेस तडा जाईल काय? या प्रश्नास उत्तर देताना त्यांनी सरकार एका प्रश्नावर चालत नसून सरकारने पुष्कळशा क्षेत्रात उल्लेखनीय बदल केले आहे.

मात्र जीवनात कधीकधी माघारही घ्यावी लागते व मार्गक्रमण करावे लागते असे विचार त्यांनी मांडले. अणुकरार पूर्णत्वास न गेल्यास तो काही जीवनातील शेवयचा क्षण नसल्याचे भावनिक उद्गारही त्यांनी काढले.
आणखी
उपहार अग्निकांडप्रकरणी याचिकेवर सुनावणी
अजमेर स्फोटप्रकरणी संशयीतांची चौकशी
अजमेरचा दर्गा बॉम्बस्फोटाने हादरला
कर्मचार्‍यांच्या संमतीशिवाय बदली नाही
बंगालमधील दुर्गापूजेची तयारी- व्हीडीओ पहा
अणुकरारावरून सरकारला धोका नाही