मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रिया मित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अजमेर बॉम्बस्फोटप्रकरणी दोघांना अटक
एएनआय
अजमेर येथील पवित्र ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्यातील गुरूवारी सायंकाळच्या बॉम्बस्फोटप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघेही बांगलादेशातील असल्याचे समजते. तपासात प्रगती झाली असून बॉम्ब ठेवण्यात आलेली पिशवी शोधण्यातही यश प्राप्त झाले आहे. या‍व्यतिरिक्त घटनास्थळावरून मोबाईलचे अवशेषही‍ सापडले आहेत.

पोलिस आज संशयीतांचे रेखाचित्र जारी करण्याची शक्यता आहे. सुरक्षीततेची पूर्वकाळजी म्हणून सीमा सुरक्षा दल व पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. कालच्या स्फोटात दोघांचा मृत्यु व सतरा जण जखमी झाल्यानंतर अजमेरमधील आज जनजीवन पूर्वपदावर आले आहे. रमझान महिन्यातील उपवासाच्या शेवयच्या दिवशी म्हणजे जुमा-अल-विदास हा स्फोट झाला होता.

प्रत्यक्षदर्शनीनुसार बॉम्ब दर्ग्याच्या कुंपणाजवळील झाडानजीक पिशवीत ठेवण्यात आला होता. स्फोटाच्या वेळी दर्ग्यात जवळपास पांच हजार भाविक होते. केंद्रीय गृहमंत्रलयाने स्फोटाची दहशतवादी हल्ला म्हणून संभावना केली आहे.
आणखी
सरकार कार्यकाळ पूर्ण करणार :पंतप्रधान
उपहार अग्निकांडप्रकरणी याचिकेवर सुनावणी
अजमेर स्फोटप्रकरणी संशयीतांची चौकशी
अजमेरचा दर्गा बॉम्बस्फोटाने हादरला
कर्मचार्‍यांच्या संमतीशिवाय बदली नाही
बंगालमधील दुर्गापूजेची तयारी- व्हीडीओ पहा