भारत- अमेरिका अणू समझोता न झाल्यास त्यांना दु:ख होईल, असे पंतपधान मनमोहन सिंह यांन स्पष्ट केले. डाव्या पक्षांशी सुरू असलेले मतभेद आणि सरकार व मित्र पक्षांना निवडणुकांना सामोरे जाण्याची इच्छा नसल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले.
'हिंदूस्तान टाईम्स नेतृत्व गोष्टी' मध्ये पंतप्रधान म्हणाले, की भारत-अमेरिका अणू करार न झाल्यास दु:ख तर होईलच, मात्र देशाची वाटचाल पुन्हा पूर्ववत होईल. याबरोबरच ते म्हणाले, की आमच्या सरकारचे मुल्यांकन करताना फक्त अणू कराराकडेचा पाहिले जाऊ नये, तर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, औद्योगोगिक विकासकामांच्या प्रभावित झालेल्या लोकांसाठीची पुनर्वसन योजना आणि अल्पसंख्याकासाठी केलेल्या कामांनाही पाहिले गेले पाहिजे.
सरकार व मित्र पक्षांना निवडणुकांना सामोरे जाण्याची इच्छा नाही. यामुळे सरकारवर अणू करार टाळण्यासाठी दबाव वाढत आहे.
|