मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रिया मित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
केंद्रीय गृहमंत्री पाटील अजमेरला
नइदुनिया

केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील अजमेरच्या दर्ग्याजवळ गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटाची पाहणी करण्यासाठी आज (शनिवार) अजमेर मध्ये दाखल झाले आहेत. या स्फोटांमध्ये शाहीद बिलालचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात असल्यामुळे श्री.पाटील याबाबत वरिष्ठ अधिका-यांशी चर्चाही करणार आहेत.

रमजानचा पवित्र महिना सुरू असताना, गुरूवारी अजमेरच्या ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्याला लक्ष्य करून हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला होता. हजारो भाविक इफ्तारसाठी जमलेले असताना दर्ग्याजवळ स्फोट झाला होते. या स्फोटात तीन जण ठार आणि २० जण जखमी झाले होते.

या स्फोटाचा संबंध हैद्राबादच्या स्फोटाशी जुळत असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र पाटील यांनी याबाबत अद्याप पर्यंत प्रसार माध्यमांशी चर्चा केलेली नाही.
आणखी
...तर मला दु:ख होईल-पंतप्रधान
माझ्या भाग्याचा निर्णय जनता करेल- मोदी
ख्वाजा दर्ग्याजवळ जिवंत बॉम्ब आढळला
अजमेर बॉम्बस्फोटप्रकरणी दोघांना अटक
सरकार कार्यकाळ पूर्ण करणार :पंतप्रधान
उपहार प्रकरणी याचिकेवर सुनावणी