मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रिया मित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
गुजरातमध्ये चेंगराचेंगरीत १२ ठार
वेबदुनिया

गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यातील पावागडच्या महाकाली मंदिरात रविवारी नवरात्रौत्सवानिमित्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या भाविकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये १२ ठार तर ५० जण जखमी झाले.

पवागडच्या महाकाली मंदिरात नवरात्रौत्सव सुरू असल्याने रविवारी लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी उपस्थित होते. गर्दीचा रेटा प्रचंड वाढल्याने अचानक चेंगराचेंगरी व पळापळीला सुरूवात झाली. त्यामध्ये १२ भाविकांचा मृत्यू झाला. ही संख्या वाढण्याचीही शंका व्यक्त केली जात आहे. चेंगराचेंगरीत ५० भाविक जखमी झाले असून यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे.
आणखी
चिदंबरम पाचवा अर्थसंकल्प मांडणार
अमेरिकन बनावटीचे युरेनियम जप्त
युवा खासदारांना संधी- सोनिया गांधी
केंद्राचा बळी नको: सोनिया गांधी
नोबेलच्या 'रेकॉर्ड बुक' मध्ये डॉ. पचौरी
राष्ट्रपती प्रतिभाताई आज अमरावतीत