मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मॉडर्न 'ममा' मुळे मुलांचे हाल
भाषा
आधुनिक जगात सारं काही बदलत आहे. यात पुरुषांच्या बरोबरीने महिलाही आपले करियर महत्त्वाचे समजत आहे. यात मुलांची हेळसांड होत असल्याचा निष्कर्ष वैज्ञानिकांनी लावला आहे.

करियरच्या नादात मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांचा स्वभाव चिडचिडा होत असल्याचे एक सर्वेक्षणात त्यांना आढळून आले आहे.

द मेकिंग ऑफ मॉडर्न मदरहूड या नावाने वैज्ञानिकांनी नुकतेच लहान मुलांचे सर्वेक्षण केले त्यात त्यांना मुलांमधील काही बदल जाणवले.

पालकांच्या दुर्लक्षाने मुले अत्यंत जिद्दी बनत असून, त्यांच्यातील आत्मविश्वासही कमी होत असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. तसेच याचा परिणाम आधुनिक आईवरही होत असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

कामाच्या ताणाने मुलांकडे तर त्यांचे दुर्लक्ष होत आहेच, पण मुलांच्या संबंधीचे काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यातही त्या चुकत आहेत.
आणखी
तिबेट असंतोषाने अरूणाचल सरकार चिंतेत
मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने सोरेन नाराज
सरबजीत चुकीने पाक हद्दीत
दहशतवाद्यांना उडवायची होती कामरूप एक्सप्रेस
एक कोटी रुपयांचे चंदन जप्त
अमिताभ आमचा चांगला मित्र-शिवसेना