नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॉंग्रेसचे राजस्थानातील दौसाचे तरुण खासदार सचिन पायलट यांना डावलण्यात आल्याने ते नाराज झाल्याचे वृत्त पसरताच, आपण मुळीच नाराज नसून पक्षाने घेतलेल्य निर्णयाचे आपण स्वागत करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात पायलट यांचा समावेश करण्यात येणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती, मात्र प्रत्यक्षात त्यांना मुळीच स्थान न देण्यात आल्याने त्यांचे समर्थक आणि ते नाराज झाल्याचे वृत्त होते.
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली देश प्रगती करत आहे. आगामी निवडणूकीतही कॉंग्रेसचेच सरकार सत्तेवर येईल असा विश्वास या प्रसंगी पायलट यांनी व्यक्त केला.
|