पाचव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारसीं विरोधात देशातील संरक्षण खात्यातील चार लाख कर्मचारी नाराज असून येत्या 22 एप्रिल रोजी विरोध दिवस साजरा करण्याचा निर्णय या कर्मचार्यांनी घेतला आहे. ऑल इंडिया डिफेन्स इम्पलॉईज फेडरेशनने ही महीती दिली.
संघटनेच्या कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लवकरच या विषयी संरक्षण मंत्री ए के एंटोनी यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संघटनेचे महासचिव सी श्रीकुमार यांनी दिली.
|