पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण घेऊन दहशतवादी कारवाया करण्याठी भारतात दाखल झालेला हिज्बूल मुजाहद्दीन या दहशतवादी संघटनेचा विभागीय कमांडर गुलाम हुसेन चकमकीत मारला गेला.
डोडा जिल्ह्यातील गांदोह भागात पोलिस आणि सूरक्षादलाच्या जवानांसोबत त्याची चकमक झाली यात तो मारला गेल्याची माहिती लेफ्टनंट कर्नल एस डी गोस्वामी यांनी दिली. गेल्या 16 वर्षांपासून पोलिसांना तो हवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
|