मध्यप्रदेशात संपूर्ण राज्यात सिमीचे नेटवर्क पसरले असल्याचे उघड झाले आहे. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी अटकसत्र सुरू केले असून, गुना जिल्ह्यात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी सिमीच्या पाच कार्यकर्त्यांच्या मुसक्या बांधल्या.
चाचौडा भागातून पोलिसांनी या कार्यकर्त्यांना जेरबंद केले. पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली तेव्हा नऊ कार्यकर्ते एकत्र येऊन बैठक घेत होते. अचानक पोलिस पाहताच या कार्यकर्त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला यात पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.
तर उर्वरित चार कार्यकर्ते पळून गेले. त्यांनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती यानंतर पोलिसांनी दिली आहे.
|