खोटे प्रमाणपत्र दाखल करून शिक्षक बनल्या प्रकरणी राजस्थान सरकारच्या शिक्षण विभागाने राज्यातील 150 शिक्षकांची नियुक्ती थांबवली आहे.
राज्य लोकसेवा आयोगा मार्फत या शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली असता यात 150 उमेदवारांनी बनावट प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आले. यानंतर सरकारने त्वरित या सर्वच शिक्षकांची निवड रद्द केली आहे.
यात अजून मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि बिहार येथील उमेदवारांच्या दाखल्यांची पडताळणी झाली नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
|