इंदूरमध्ये काही दिवसांपूर्वी जेरबंद करण्यात आलेल्या स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट अर्थात सिमीच्या कार्यकर्त्यांची नार्को चाचणी बेंगलूरू मध्ये सुरू करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या म्होरक्या सफदर नागोरी याची सर्वात आधी चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त मधुकुमार यांनी दली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मध्यप्रदेशात सिमीच्या कारवायांत वाढ झाल्याचा सुगावा पोलिसांना लागताच त्यांनी सुरू केलेल्या धाडसत्रात जवळपास दोन डझनाहून अधिक कार्यकर्ते अटक करण्यात आले आहेत. यात सिमीचा अत्यंत कट्टर साफदर नागोरीचाही समावेश आहे. त्याच्यावर मुंबई लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप आहे.
या कार्यकर्त्यांची नार्को चाचणी केल्यास आणखी महत्त्वाची माहिती उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. यानंतर केंद्र सरकारने नार्कॅ चाचणीची परवानगी दिली. आता बेंगलूरू येथील नार्को चाचणी केंद्रात त्यांची चाचणी सुरू असून याला तीन दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती मधुकुमार यांनी दिली आहे.
|