उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांच्या विरोधात जातीवाचक उद्गार काढल्या प्रकरणी भारतीय किसान संघटनेचे अध्यक्ष महेंद्रसिंह टिकेत यांची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगा मार्फत चौकशी करण्यात येणार आहे.
आयोगाचे अध्यक्ष बूटा सिंह यांनी ही माहिती दिली. आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचे ते म्हणाले. टिकेत यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते या प्रकरणात दोषी आढळून आल्यास त्यांच्या विरोधात योग्यती कारवाई करण्यासाठी आपण राष्ट्रपतींचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
|