विधानसभा निवडणुकांचे नगारे आतापासूनच घुमायला सुरूवात झाली असून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी मेहुबुबनरगर जिल्ह्यात दोन रूपयात किलोभर तांदूळ योजनेचा शुभारंभ करणार आहेत.
गरीबांना हमखास अन्न मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्यात येत आहे. गरीबांच्या कल्याणासाठीची सरकारची वचनबद्धता यातून स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. दारिद्र्य रेषेखालील सुमारे पावणे दोन कोटी नागरिकांना योजनेचा लाभ होईल.
पांढर्या कार्डधारकांना आतापर्यंत स्वस्त अन्नधान्य पुरवठा दुकानांमार्फत सव्वापाच रूपये दराने तांदूळ मिळत होते. योजनेमुळे सरकारी तिजोरीवर एक हजार कोटीचा बोजा पडणार आहे.
माजी मुख्यमंत्री व तेलगू देसम पक्षाचे संस्थापक एन. टी. रामाराव यांनी 1983 मध्ये सत्तेत आल्यानंतर 'दोन रूपयात किलोभर तांदूळ' योजनेस पहिल्यांदा सुरूवात केली होती.
|