कर्नाटकात भारतीय प्राशासनिक सेवेतील अधिकार्याच्या पत्नीने राज्यपालांना आपल्या पतीस सेवेतून बडतर्फ कण्याची विनंती केली आहे. 'भ्रष्टाचार विरुद्ध मोहीम' चालवल्याने त्यांच्या जीवितास धोका असल्याचा भिती तिने व्यक्त केली आहे.
बेळगाव कमांड क्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रशासक एम. एन. विजयकुमार यांची पत्नी के. एन. जयश्री यांनी राज्यपाल रामेश्वर ठाकुर यांना आपल्या पतीच्या जीवास धोका असल्याने सहा महिन्यांसाठी त्यांना बडतर्फ ठेवण्याची विनंती केली आहे.
विजयकुमार यांना धमक्या देण्यात आल्यानंतर त्यांनी सप्टेंबर व डिसेंबरमध्ये पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र बेळगाव पोलिसांनी अद्याप कारवाई न केल्याने पतीस बडतर्फ करून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
भ्रष्टाचाराविवद्धच्या लढ्यात पतीच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिलेल्या जयश्री यांनी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनाही पत्र पाठवून विजयकुमार यांची वारंवार ट्रांसफर का करण्यात येते? याची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
|