भारतासोबत तेल, वायु, विजनिर्मिती व खणन क्षेत्रात आर्थिक सहकार्य वृद्धींगत करण्याची इच्छा रशियाने व्यक्त केली आहे. सार्वजनिक व खाजगी क्षेत्राच्या सहकार्यातून दोन देशांदरम्यान संबंध दृढ होतील याबाबत त्यांनी विश्वास व्यक्त केला.
दोन देशांदरम्यान सामंजस्य असून व्यापक सहकार्यास भरपू वाव असल्याचे मत रशियाचे भारतातील राजदूत हॅचेस्लाव्ह ट्रबनिकोह यांनी व्यक्त केले आहे.
द्विपक्षीय व्यापारात मागील वर्षी चाळीस टक्यांच्या वृद्धीसह पाच बिलियनवर पोहचला असून ब्राझील, रशिया, भारत व चीनच्या झपाट्याने वाढणार्या अर्थव्यवस्था लक्षात घेता दहा बिलियनचे लक्ष गाठणे शक्य आहे.
भारतासोबत ऊर्जा, वाहतूक, जैवतंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, नागरी हवाई वाहतूक, पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रात सहकार्यास रशिया उत्सुक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
|