देशात वाढत्या महागाईला नियंत्रित करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे अर्थमंत्री एकीकडे म्हणत असले, तरी आपण महागाईपुढे हतबल असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी व्यक्त केल्याने महागाईपुढे सरकारने गुडघे टेकले आहेत.
महागाईचा वाढतादर खाली खेचायचा असेल, तर आंतरराष्ट्रीय समुदायाचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
जागतिक कृषी संमेलनात पंतप्रधान यांनी वाढत्या महागाई सोबतच देशातील कृषी उत्पादनांमध्ये सातत्याने घट होत असल्या बद्दलही चिंता व्यक्त केली आहे.
देशात गहू आणि डाळींचा वाढत्या किंमती रोखण्याचा सरकारने भरपूर प्रयत्न केला आहे, पण सरकारला यात म्हणावे तसे यश मिळत नसल्याचे ते म्हणाले.
|