सवौच्च न्यायालयाने हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता संजय दत्त यांस चित्रीकरणासाठी परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. मुख्य न्यायमूर्ती के. जी. बालक्रिश्नन यांनी संजयला तीस सप्टेंबरपर्यंत परत येऊन न्यायालयास पारपत्र सादर करण्याचा आदेश दिला.
खंडपीठाने त्यास चित्रीकरणाचे काम आटोपल्यानंतर देशात परत येण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासही सांगण्यात आले आहे. संजयने तेरा मार्चला सवौच्च न्यायालयास मलेशिया, थायलंड व अमेरिकेस जाण्यासाठी परवानगी मागितली होती.
|