भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण करण्याचा दृष्टीने भारतीय लष्कराने पहिले पाऊल टाकले आहे. संरक्षण परिषदेत गुरुवारी लष्कराने हवाईदलासाठी 384 हेलिकॉप्टर घेण्यास मंजुरी दिली आहे.
लष्कराच्या वाढत्या गरजा पाहता 259 हेलीकॉप्टर हवाईदलाला देण्यात येणार आहेत. यासाठी सहा हजार चारशे रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे.
काल संरक्षण मंत्री ए के एंटोनी यांच्या नेतृत्वा खाली झालेल्या संरक्षण बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे, यात 197 हेलिकॉप्टरर्स प्रत्यक्ष कंपन्यांकडून खरेदी करण्यात येणार आहेत. बाकी 187 हेलीकॉप्टर्स हिंदुस्तान एरोनॉटीकल्समध्ये तयार करण्यात येणार आहेत.
|