जातीच्या आधारे आरक्षणाला परवानगी नाकारणार्या आणि या विरोधात आंदोलनात्मक पावित्रा घेतलेल्या यूथ फॉर इक्वालिटी अर्थात वायएफई या संघटनेने सर्वोच्च न्यायालयाने उच्च शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणाला दिलेल्या परवानगी बद्दल खेद व्यक्त केला आहे.
न्यायालयाचा निर्णय दुर्देवी असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आपण आव्हान देणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले असून, आरक्षणा विरोधातील आपला संघर्ष सूरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. देशात जाती-पातींच्या आधारे केले जाणारे भेदभाव चुकीचे असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
|