मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
जादुगार सरकार दाखवणार पाण्यावर करामती
एएनआय
जादूगार पी. सी. सरकार यांच्या ताज महल गायब करणे, दूर अंतरावरच्या आगगाडीने थरकाप उडवण्यासारख्या करामतीनंतर सर्वांना अवाक् करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ते खोल पाण्यावर सायकल चालवून प्रेक्षकांना तोंडात बोटे घालण्यास भाग पाडणार आहेत.

एका खाजगी दूरचित्रवाणी वाहिनीसाठी ही करामत त्यांनी सादर केली असून लवकरच मोठ्या प्रमाणातील प्रेक्षकांसमोर ते हा प्रयोग सादर करतील. योगी पुरूष पाण्यावरून चालल्याचे आपण वाचले आहे, मात्र आपण त्याकडे चम्काराच्याच दृष्टीने बघतो.

यापासून प्रेरणा घेऊनच पाण्यावरून सायकल चालवण्याचा विचार आला. यासाठी कोणत्याही प्रकारची सायकल उपयोगात आणता येईल किंवा समुद्र, तळे, नदी कोणत्याही पाण्यावर हा प्रयोग शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

यासाठी‍ हवामानाकडेही लक्ष द्यावे लागते, कारण पाणी रौद्र रूप धारण करण्याची शक्यता असते. भौतिकशास्त्रातल्या मूलभूत सिद्धांतावर हा प्रयोग आधारीत आहे.
आणखी
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दुर्देवी -वायएफई
हेलीकॉप्टर खरेदीला मंजुरी
संजय दत्तला परदेशात जाण्याची परवानगी
महागाईपुढे पंतप्रधान हतबल
'आयआयएम' प्रवेश यादीस आठवड्याचा विलंब
रेल्वे अधिकार्‍यांचा इराण दौरा