मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
बस दरीत कोसळून 16 ठार
वार्ता
डेहराडून जवळील जौनसार भागातील बावर क्षेत्रात त्यूनी- मीनास विकासनगर मार्गावर एक खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 16 प्रवासी जागीच ठार झाले.तीन प्रवासी अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत.

300 फूट खोल दरीत ही बस कोसळल्याने बचावकार्यात अनेक अडथळे येत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यूनी वरुन ही बस चालकासह 19 प्रवाशांना घेऊन मीनसकडे निघाली होती.

दुपारी साडे तीन वाजता बस क्वानू पासून सहा किलोमीटर अंतरावर म्यारखंड भागात आल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस सरळ दरीत जाऊन कोसळली. 15 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.मृतांमध्ये पाच मुले तर एका गर्भवती महिलेचा समावेश आहे.
आणखी
जादुगार सरकार दाखवणार पाण्यावर करामती
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दुर्देवी -वायएफई
हेलीकॉप्टर खरेदीला मंजुरी
संजय दत्तला परदेशात जाण्याची परवानगी
महागाईपुढे पंतप्रधान हतबल
'आयआयएम' प्रवेश यादीस आठवड्याचा विलंब