भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे शिल्पकार आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू हे आरक्षणाच्या विरोधात होते.
आरक्षण हा केवळ मूर्खपणाच नाही, तर देशासाठी ते घातक असल्याचे त्यांचे मत होते. भारतीय जनता पार्टीचे नेता अरुण शौरी यांनी लिहलेल्या पुस्तकात पंडित नेहरूंचे 27 जून 1961 साली लिहिलेले एक पत्र प्रकाशित करण्यात आले आहे. हे पत्र नेहरूंनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पाठवले होते.
'आरक्षण का दंगा' या नावाने शौरी यांचे हे पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. अनुसूचित जाती आणि जमातींकडून आरक्षणा विषयाची सातत्याने मागणी होत असून, आपण या मागणीला कंटाळल्याचे नेहरू यांनी स्पष्ट केले आहे.
त्यांना मदतीची गरज आहे यात दुमत नाही पण त्यांना कोरत्याही स्वरूपाचे आरक्षण देण्यास आपला विरोध असल्याचे नेहरूंचे मत होते. आरक्षणामुळे देशात मतभेद वाढतील आणि संघर्ष निर्माण होईल अशी भितीही नेहरूंनी या पत्रात व्यक्त केली होती.
|