राकेश रोशनची 'क्रेझी-४ आणि अजय देवगण दिग्दर्शित 'यू, मी और हम' या दोन्ही चित्रपटांनी शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर चांगली सुरवात केली.
क्रेझी-४ मध्ये शाहरूख खान आणि ह्रतिक रोशनचे आयटम सॉंग असल्याने चांगली ओपनिंग मिळायला त्याचा फायदा झाला. त्याचवेळी अजय आणि काजोल या जोडीला पाहण्यासाठीही प्रेक्षकांनी गर्दी केली होती.
क्रेझी-४ मधील एका गाण्याची चोरी केल्याच्या प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादाचा फायदा चित्रपटाला झाला. शिवाय दोन बड्या कलाकारांची आयटम सॉंग हेही मुख्य आकर्षण होते. त्याच्या जोरावरच चित्रपट चालेल. त्याच्या जोडीला अर्शद वारसी, राजपाल यादव, सुरेश मेनन आणि इरफान खान यांचा अभिनय चित्रपटाला पुढे नेणारा आहे.
|