मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
भारत-बांगलादेश दरम्यान 'मैत्री पर्वास' सुरुवात
भाषा
दोन देशातील नागरिकांमध्ये सौहार्द वाढवण्याच्या उद्देशाने भारत बांगलादेश दरम्यान सुमारे चार दशकाच्या कालखंडानंतर 'मैत्री एक्सप्रेस'चा नव्याने शुभारंभ करण्यात झाला आहे. बंगाली नववर्षाच्या मुहूर्तावर कोलकाता-ढाका मैत्री एक्सप्रेसने आज येथून मैत्रीच्या प्रवासास सुरुवात केली.

परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी गाडीला हिरवी झेंडी दाखवली. रेल्लेमंत्री लालू प्रसाद यांच्या उपस्थितीत मुखर्जी यांनी हिरवी झेंडी दाखवून ऐतिहासिक प्रवासास सुरुवात केली. कोलकाता व ढाका कँटॉनमेंट दरम्यान ही गाडी आठवड्यातून दोनदा धावेल. कोलकाता येथून शनिवार व रविवारी सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी प्रवासास सुरुवात करून ढाक्यास रात्री साडेदहा वाजता पोहचेल.
आणखी
मंसूर भारत-पाकवर ऐतिहासिक चित्रपट करणार
आयआयटीच्या परिक्षेला तीन लाख वीस हजार विद्यार्थी
बुधियाच्या प्रशिक्षकाची गोळ्या घालून हत्या
नितीश कुमारांचा आठ मंत्र्यांना डच्चू
रस्ता अपघातात बारा ठार,एकोणपन्नास जखमी
सिलगुडीत आढळली स्फोटके व टाइमबॉम्ब