गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यात प्रवासी वाहतूक बस नदीत कोसळल्याने दोघे मृत्युमुखी पडले तर वीस जखमी झाले. जखमीमध्ये आठ पाकिस्तानी नागरिकांचाही समावेश आहे. भरधाव बस खारी नदीवरील पुलाच्या कठड्यास धडकून नदीत कोसळल्याने हा अपघात झाला.
राजस्थान परिवहन महामंडळाची बस जोधपूरहून अहमदाबाहला जात होती. पाकिस्तानी नागरिक अहमदाबादहून विमान पकडण्यासाठी प्रवास करत होते. प्राथमिक वृत्तानुसार ते कराची येथील आहेत. जखमींना मेहसाना येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
|