मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
किंमतवाढ यूपीएस अडचणीत आणू शकते
भाषा
सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंमतवाढ संयुक्त पुरोगामी आघाडी समोरील अवघड आव्हान ठरू शकते,असे भाकीत पॉलीटब्युरो सदस्य सीताराम येचुरी यांनी केले आहे.

सरकारने किंमतवाढ नियं‍त्रणात आणतानाच वस्तूंच्या दरावर निर्बंध घालून सामान्यजनांचे जगणे सुसह्य न केल्यास आठ टक्क्यांपेक्षा अधिकच्या आर्थिक विकास दराचा मनोरा ढालळण्यास वेळ लागणार नाही. किंमतवाढीविरूद्ध डाव्या पक्षांचे सर्व खासदार संसदेपर्यंत निदर्शन यात्रा काढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आटोक्यात याव्यात यासाठी सरकारविरूद्धच्या निदर्शनांचा हा भाग आहे. डावे पक्ष सोळा ते तेवीस एप्रिलपर्यंत संपूर्ण देशभर किंमतवाढीविरूद्ध निदर्शने करणार आहेत. किंमतवाढीच्या मुद्दयावर डावे सरकारचा पाठिंबा काढणार काय? या प्रश्नावर भारतीय जनता पक्ष व कॉंग्रेसचे आर्थिक धोरण सारखेच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


आणखी
अपघातात दोन ठार, पाक नागरिकही जखमी
पंतप्रधानपदासाठी राहूल योग्य-अर्जुनसिंह
भारत-बांगलादेश दरम्यान 'मैत्री पर्वास' सुरुवात
मंसूर भारत-पाकवर ऐतिहासिक चित्रपट करणार
आयआयटीच्या परिक्षेला तीन लाख वीस हजार विद्यार्थी
बुधियाच्या प्रशिक्षकाची गोळ्या घालून हत्या