पाकिस्तानी तुरुंगात गेल्या अनेक वर्षांपासून कैदेत असलेल्या सरबजीत सिंह याच्या कुटुंबीयांना पाकिस्तानने व्हिसा देण्यास नकार दिला आहे. पाकमधून त्यांना कोणीही आमंत्रण दिले नसल्याने त्यांना व्हिसा देता येणार नसल्याचे कारण पाक सरकारने दिले आहे.
काही दिवसांपूर्वी पाकचे मानवाधिकार मंत्री अन्सार बर्नी भारतात आले होते. त्यांनी सरबजीच्या सुटकेसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले होते.
यानंतर सरबजीची भेट घेण्यासाठी त्याची पत्नी सुखप्रीत कौर, बहिन दलबीर कौर, आणि सरबजीतच्या दोन मुलींनी पाकमध्ये जाण्यासाठी सरकारकडे व्हिसासाठी अर्ज केला होता. पण त्यांना प्रवेश देण्यास पाक सरकारने नकार दिला आहे.
|