मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
ऑलिंपिक मशालीला तिबेट‍ींचे आव्हान
नइदुनिया
संपूर्ण जगभरातून विरोधाचा सामना कराव्या लागणार्‍या ऑलिंपिक मशालीला आता आव्हान देण्याचा निर्णय भारतात वास्तव्यास असलेल्या तिबेटी नागरिकांनी घेतला आहे.

17 एप्रिलला भारतात ही मशाल दाखल होत असल्याने सरकारने सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली असतानाच दुसरीकडे या मशालीच्या विरोधात तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी समांतर मशाल रॅली काढण्याचा निर्णय तिबेटी नागरिकांनी घेतला आहे.

राजधानी दिल्लीतील महात्मा गांधी स्मारकापासून ही रॅली सुरू होणार असून, जंतरमंतर पर्यंत तिबेटी नागरिक ही मशाल रॅली काढणार आहेत.
तिबेटी सॅलिडेरिटी कमिटीचे अध्यक्ष त्सेन नोरदु यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, असे झाले तर भारत सरकारची डोकेदुखी आणखी वाढणार आहे.

आधीच ऑलिंपिक मशालच्या संरक्षणासाठी सरकारवर चीनचा दबाव वाढला आहे. त्यात आता तिबेटींनी समांतर रॅली काढण्याचा निर्णय घेतल्याने सरकारवर याचेही दडपण असणार आहे.
आणखी
सरबजीतच्या कुटुंबीयांना व्हिसा नाकारला
गोव्यात चालतेय 'सेक्स रॅकेट'
अडवाणींनंतर आता मोदींचे पुस्तक
किंमतवाढ यूपीएस अडचणीत आणू शकते
अपघातात दोन ठार, पाक नागरिकही जखमी
पंतप्रधानपदासाठी राहूल योग्य-अर्जुनसिंह