मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मी नलिनीला भेटले होते- प्रियंका गांधी
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची मारेकरी नलिनीची आपण भेट घेतल्याचा खुलासा प्रियंका गांधी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.गेल्या दोन दिवसांपासून हे प्रकरण चांगलेच गाजत असून, आज प्रियंका यांनी हा खुलासा केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही कबुली दिली. चेन्नईतील वेल्लोर न्यायालयात आपण नलिनीला भेटल्याचे त्या म्हणाल्या.

आपल्या वैयक्तिक कामानिमित्त आपण तेथे गेलो होतो, तेव्हा आपल्याला नलिनी विषयीची माहिती मिळाल्याचे त्या म्हणाल्या.

तिच्याशी नेमकी काय चर्चा झाली हे सांगण्यास त्यांनी नकार दिला असला तरी, जगात सध्या शांतता प्रस्थापित करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.
आणखी
ऑलिंपिक मशालीला तिबेट‍ींचे आव्हान
सरबजीतच्या कुटुंबीयांना व्हिसा नाकारला
गोव्यात चालतेय 'सेक्स रॅकेट'
अडवाणींनंतर आता मोदींचे पुस्तक
किंमतवाढ यूपीएस अडचणीत आणू शकते
अपघातात दोन ठार, पाक नागरिकही जखमी