संगमनेरपासून जवळच असलेल्या चंदनपूरी शिवारात रस्त्याच्या कडेला नादुरुस्त झाल्याने उभ्या असलेल्या मालमोटारीवर मारुती कार आदळून झालेल्या अपघातात प्रसिद्ध शिल्पकार मदन गर्गे हे जागीच ठार झाले. ते आपल्या सहकार्यांसह नाशिककडे जाताना राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला.
मारुतीतील इतर मंदार गर्गे, ज्येष्ठ नेपथ्यकार आनंदा ढाकीफळे, अमोल ढाकीफळे, हे या अपघातात जखमी झाले असून, त्यांना नाशिकमधील खाजगी रुग्णालयात हालवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गर्गे आपल्या सहकार्यासमवेत(एमएच-14 एके- 6859) ने नाशिककडे चालले होते.चंदनपूरी शिवारात उभ्या असलेल्या एम एच 17- 5419 या गाडीवर गर्गे यांची मारुती मागून आदळली. यात गर्गे यांचा जागीच मृत्यू झाला.
|