मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
देशात 175 सक्रिय दहशतवादी संघटना
देशातून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याच्या सरकारी प्रयत्नांना गृहमंत्रालयाने केलेल्या खुलाशाने चांगलाच धक्का बसला आहे.

सरकारला एक, दोन नाही तर विविध राज्यातील 175 सक्रिय दहशतवादी संघटनांचा सामना करावा लागणार आहे. यात ाही छोट्या गटांचाही समावेश असला, तरी हे गट अत्यंत सक्रिय मानले जातात. मुंबईत अशा प्रकारचे आठ ते दहा दहशतवादी संघटना सक्रिय असल्याची माहिती दहशतवाद विरोधी विभागाचे प्रमुख हेमंत करकरे यांनी दिली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंबंधीचा एक अहवाल नुकताच सरकारकडे सुपूर्द केला आहे. इतके दिवस जम्मू काश्मीरचे नाव या यादीत प्रथम क्रमांकावर होते, आता जम्मूला मागे टाकत पूर्वे कडील राज्यांनी ही जागा घेतली असल्याचे हा अहवाल सांगतो.

सरकार आणि गुप्तचर विभागाने तयार केलेल्या अहवालात दहशतवाद्यांना संशयित, विद्रोही, बंडखोर, आणि दहशतवादी अशा विविध प्रकारात विभागण्यात आले असून, सरकारने यासर्वांवरच पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे.

मणीपूर आणि आसाममध्ये अशा स्वरूपाच्या सर्वाधिक संघटना कार्यरत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. यात मणीपुरमध्ये 39 तर आसामात 36 संघटना कार्यरत आहेत. त्रिपुरात 30, मेघालयात चार, नागालँडमध्ये तीन, मिझोरममध्ये दोन आणि अरुणाचलप्रदेशात एक दहशतवादी संघटना कार्यरत आहे.

या सर्वांना देशांतर्गत किंवा देशाबाहेरून मदत मिळत असल्याचे सरकारने मान्य केले असून त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

मुंबईत एलटीटी, सिमी, टीएलए(तामळिनाडू लिबरेशन आर्मी), कामाटापूर लिबरेशन ऑर्गनायजेशन या संघटना सक्रिय आहेत.
आणखी
शिल्पकार मदन गर्गे यांचे अपघाती निधन
मी नलिनीला भेटले होते- प्रियंका गांधी
ऑलिंपिक मशालीला तिबेट‍ींचे आव्हान
सरबजीतच्या कुटुंबीयांना व्हिसा नाकारला
गोव्यात चालतेय 'सेक्स रॅकेट'
अडवाणींनंतर आता मोदींचे पुस्तक