मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सेतुसमुद्रम प्रकरणी सुनावणी एकोणतीसला
भाषा
सवौच्च न्यायालयाने सेतुसमुद्रम प्रकरणी केंद्राने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी एकोणतीस एप्रिलला करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राने एकोणतीस फेब्रुवारीस नवीन प्रतिज्ञापत्र दाखल करून सेतुसमुद्रम प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची परवानगी मागितली होती.

यामध्ये श्रद्धेच्या प्रश्न वैज्ञानिक पुराव्यांद्वारे सोडवणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. सेतुसमुद्रम प्रकल्पास दोन वर्षापासून सुरू असलेला विरोध तथ्यहीन असल्याने त्याची दखल घेऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती.

केंद्राने पाच ऑक्टोबरला नियुक्त करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीने प्रकल्पाचा अभ्यास केला होता. राम सेतू प्रकल्प सर्वच दृष्टिकोनातून भक्कम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने सप्टेंबरमध्ये प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वाबद्दल व मानवनिर्मित राम सेतू बद्दल शंका उपस्थित करून वादळ निर्माण केले होते. जनप्रक्षोभ उसळल्यानंतर हे प्रतिज्ञापत्र मागे घेण्यात आले होते.
आणखी
राष्ट्रवादीच्या संगमांचा राजीनामा मंजूर
देशात 175 सक्रिय दहशतवादी संघटना
शिल्पकार मदन गर्गे यांचे अपघाती निधन
मी नलिनीला भेटले होते- प्रियंका गांधी
ऑलिंपिक मशालीला तिबेट‍ींचे आव्हान
सरबजीतच्या कुटुंबीयांना व्हिसा नाकारला