तामिळनाडूतील खेड्यात राहणारे आदिवासी हे आफ्रिकेतून भारतात पहिल्यांदा स्थलांतरित होणार्यांपैकी असल्याचा आनुवंशिक पुरावा शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे.
मदुराई कामराज विद्यापीठातील शास्त्रज्ञ प्राध्यापक रामस्वामी पीच्चमन यांना मदुराईजवळील ज्योतीमनीकम येथील खेडुतामधील जीन भारतात पहिल्यांदा स्थलांतरित झालेल्याच्या जीनशी जुळत असल्याचे आढळून आले आहे.
त्यांनी ऑक्सफर्ड संशोधन विद्यापीठाच्या सहकार्याने हा अभ्यास केला आहे. यावरून भारतात सुमारे सत्तर हजार वर्षापूर्वी पहिल्यांदा स्थलांतरानं झाल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. या खेड्यातील विरूमंडी अंदीथेवर या तीस वर्षीय इसमाचा डिएनए एम-130 मार्करशी जुळला आहे.
हा मार्कर भारतातील सर्वात प्राचीन मार्कर आहे. यावरून ते भारतात सर्वप्रथम स्थायिक झाल्याचे स्पष्ट होते. अभ्यासाचा निष्कर्ष डिस्कव्हरी चॅनेलवरून प्रदर्शित करण्यात येईल. यामध्ये इतिहासकार मायकेल वुड जगातील प्राचीन संस्कृतीच्या कथेचे कथन करणार आहेत. 'द स्टोरी ऑफ इंडिया' हा कार्यक्रम सोळा एप्रिलपासून दाखवण्यात येईल.
|