अखेर बिजींग ऑलिंपिक ज्योत काल रात्री भारतात दाखल झाली. अत्यंत कडेकोट बंदोबस्तात ज्योतीचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विविध रंगात रंगलेल्या विद्यार्थ्यांनी ज्योतीचे स्वागत केले.
72 सेमी लांब आणि 975 ग्राम वजनाची ही ज्योत इस्लामाबाद वरून भारतात दाखल झाली आहे. आज सायंकाळी राजधानी दिल्लीत ऑलिंपिक रॅली निमित्त ही ज्योत भारतात दाखल झाली आहे.
जगभरातील तिबेटी नागरिकांनी या ज्योतला विरोध केल्याने भारतात या ज्योतीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रात्री दहा वाजता दिल्लीत ऑलिंपिक ज्योत दाखल झाल्यानंतर भारतीय ऑलिंपिक संघाचे अध्यक्ष सुरेश कलमाडी आणि चिनी राजदूत झांग यान यांनी ज्योतचे स्वागत केले.
तिबेटी नागरिक मोठ्या संख्येने भारतात वास्तव्यास असल्याने आणि जगभरातून विरोधाचा सामना करावा लागल्याने ऑलिंपिक ज्योतीच्या रक्षणासाठी राजधानीत 15 हजार पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे.
|