मद्रास उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षते खाली फोन टॅपींग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याची आधीकृत घोषणा सरकारने काल केली.
हा आयोग राज्याचे मुख्य सचिव एल के त्रिपाठी आणि वरिष्ठ पोलिस आधीकारी यांच्या दरम्यान झालेल्या संवादाच्या टॅपींग प्रकरणाची चौकशी करणार आहे.
निवृत्त न्यायाधीश पी षन्मुगम यांची या आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
|