देशातील पाच राज्यांच्या पोलिस कोठडीत गेल्या सात वर्षात 53 जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री प्रकाश जैस्वाल यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. 2001 ते 08 दरम्यान उत्तरप्रदेश पोलिसांच्या कोठडीत 32 जण, मध्यप्रदेशात 10, ओरीसात सहा, छत्तीसगडमध्ये तीन, तर राजस्थानात दोघांचे प्राण गेले आहेत.
त्यांच्या मृत्यूचे कारण सांगण्याचे टाळत जैस्वाल यांनी यात दोषी अधीकार्यां विरोधात योग्यती कारवाई केल्याचे स्पष्ट केले.
|