मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सरबजीतच्या कुटुंबीयांना व्हिजा मिळाला
दिल्लीतील पाक उच्चन्यायालयाने सरबजीतच्या कुटुंबीयांना व्हिजा नाकारल्यानंतर अखेर इस्लामाबादमधून त्यांना हिरवा कंदील मिळाला आहे.

पाक सरकारने त्यांना देशात प्रवेश करण्याची परवानगी देत त्यांचा व्हिजा मंजूर केल्याने सरबजीतचे कुटुंबीय आता पाकमध्ये त्याची भेट घेऊ शकतील.

गेल्या अनेक वर्षांपासून पाकमधील तुरुंगात सरबजीत सिंग याला पाक सरकारने डांबून ठेवले आहे. पाकमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा त्याच्यावर आरोप लावत तेथील न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली असून, भारत सरकारच्या प्रयत्नांनंतर 30 एप्रिल पर्यंत त्याची फाशी टाळण्यात
आली आहे.

सरबजीतला पाकमध्ये भेटण्याची इच्छा त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली होती, यासाठी त्यांनी पाक उच्चालयात व्हिसा देण्यासाठी अर्ज केला होता.

त्यांना पाकमधून कोणीही भेटीचे आमंत्रण पाठवले नसल्याचे कारण सांगत पाकने त्यांचा व्हिसा नाकारला होता, पण अखेर इस्लामाबाद मधून त्यांना परवानगी स्वीकारण्यात आल्याने सरबजीतचे कुटुंबीय पाकमध्ये त्याला भेटू शकतील.
आणखी
सीमेवर पाकचे नऊ मोबाईल टॉवर
क्रीमीलेअरलाही आरक्षण देण्याची मागणी
पोलिस कोठडीतील 'अबतक 53'
आयआयटी देणार 9 टक्के ओबीसी कोटा
बिरंचीच्या पत्नीला हवा आहे न्याय
फोन टॅपींग प्रकरणात आयोगाची स्थापना